Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदार संघ क्षेत्रात मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात तब्बल 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणूक सुरू असून त्याअनुषंगाने लागू असलेली विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता, यामुळे मावळ विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी पथकांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
मावळ येथील शिरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उर्से टोल नाका परिसरात स्थिर सर्वेक्षण पथकाने सायंकाळी 5 वाजून 10 वाजता कारमधून 17 लाख 75 हजार रोकड जप्त केली. कारचालक पियुष जखोडीया (वय वर्ष 34) यांना याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. मावळ येथील शिरगाव पोलिस ठाण्याचे हद्दीत उर्से टोलनाका येथे खोपोली कडून पुण्याला जात असलेल्या कारची तपासणी केली असता वाहन क्रमांक MH-12,UC-5535 मध्ये रोकड सापडली.
कार चालकाकडे चौकशी केली असता त्यांचा कापड व्यवसाय असून ते पुण्यात दिवाळी करता खरेदीस जात असल्याचे सांगितले. मात्र, तपासात तफावत आढळल्याने रक्कम जप्त करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रक्कम सदानंद आर करलू, डी.सी.आय.टी, आयकर विभागाकडे पुणे यांकडे पुढील कार्यवाहिस हस्तांतरित करण्यात आली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाविकासआघाडी भूमिका जाहीर करणार? स्वतंत्र उमेदवार देणार की बापूसाहेब भेगडेंना पाठींबा देणार? तालुक्यात वेगळीच चर्चा
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
– मावळात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! बापूसाहेब भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा