Dainik Maval News : मावळ तालुका काँग्रेस (आय) पक्षाच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मावळ तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे पक्षाकडून निलंबन करण्यात आले आहे. पक्षाची शिस्त मोडल्याने त्यांच्यावर तब्बल सहा वर्षे निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.
का झाली कारवाई?
आज, गुरुवारी (दिनांक 24 ऑक्टोबर) महायुतीकडून सुनिल शेळके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी वडगाव मावळ शहरात मोठ्या संख्येने शेळकेंचे समर्थक उपस्थित होते. तसेच वेगवगेळ्या पक्षातील नेतेही शेळकेंना पाठींबा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी मावळ तालुका काँग्रेसचे नेते माऊलीभाऊ दाभाडे हे आश्चर्यकारकरित्या सुनील शेळके यांना पाठींबा देण्यासाठी मंचावर उपस्थित होते. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करीत त्यांचे सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबन केले आहे.
वरीष्ठांच्या आदेशाने कारवाई
पक्षाचे वरीष्ठ नेते यांनी याबाबत आपल्याला सूचना दिल्या. त्यानुसार आपण ही कारवाई केल्याचे यशवंत मोहोळ यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. काँग्रेस आय हा पक्ष महाविकासआघाडीची घटकपक्ष आहे. त्यामुळे सुनील शेळके हे महायुतीचे उमेदवार असल्याने दाभाडे यांनी त्यांच्या मंचावर जात पाठींबा दिल्याने पक्षाची शिस्त मोडली, असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महाविकासआघाडी भूमिका जाहीर करणार? स्वतंत्र उमेदवार देणार की बापूसाहेब भेगडेंना पाठींबा देणार? तालुक्यात वेगळीच चर्चा
– मावळच्या राजकारणात मोठा भूकंप ! बाळा भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा, बाळाभाऊंसोबत भाजपाच्या शेकडो पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
– मावळात राष्ट्रवादीला मोठा धक्का ! बापूसाहेब भेगडे यांच्याकडून पदाचा राजीनामा