Dainik Maval News : नुकतीच मोठ्या भावाची ग्रामविकास अधिकारीपदी निवड झाली असतानाच, आता लहान भावाची देखील महाराष्ट्र राज्य शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क पोलीसपदी निवड झाली आहे. मावळ तालुक्यातील ताजे या छोट्या गावातील शेतकरी कुटुंबातील दोन्ही भावांची शासकीय सेवेत निवड झाल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे.
ग्रामविकास अधिकारीपदी नियुक्ती झालेले चेतन केदारी हे कृषी पदवीधर आहेत. तर राज्य उत्पादक शुल्क पोलीसपदी निवड झालेले त्यांचे लहान भाऊ रवी केदारी हे स्थापत्य अभियंता आहेत. मुलांच्या यशात त्यांच्या पालकांचा मोलाचा वाटा आहे. नाजूक परिस्थिती असताना देखील त्यांनी आपल्या मुलांना कुठलीच उणीव भासू दिली नाही. अतिशय काबाडकष्ट करून आई-वडीलांनी तिघाही बहीण-भावंडांना उच्चशिक्षण दिले.
रवी यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ताजे येथे झाले. पुढील माध्यमिक शिक्षण श्रीमती शांतिदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय भाजे येथे झाले. बारावीचे शिक्षण लोणावळा येथे व पुढे अभियांत्रिकीचे शिक्षण व्ही. आय. टी. कॉलेज कामशेत येथे झाले. रवि हे नगरपरिषद तळेगाव दाभाडे अभ्यासिकेत स्पर्धापरिक्षेचा अभ्यास करत होते. तर यशस्वी करियर अकॅडमीच्या उडाफे सरांच्या मार्गदर्शनाखाली शारिरीक चाचणीची तयारी केली.
राज्य उत्पादन शुल्क पोलीस पदासाठी राज्यस्तरावर 120 गुणांची लेखी परीक्षा व त्यानंतर 80 मार्कांची शारिरीक चाचणी अशी एकूण 200 गुणांची परीक्षा झाली होती. ह्या दोन्ही परीक्षेत पात्र होऊन उत्तम गुण संपादन करत प्रवर्गातून संपूर्ण महाराष्ट्रातून 7 व्या क्रमांकाने रवी केदारी यांची निवड झाली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कान्हे येथील दुहेरी हत्याकांडातील प्रमुख आरोपीला जन्मठेपेची शिक्षा, वडगाव मावळ न्यायालयाचा निर्णय । Maval News
– मोठी बातमी ! काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माऊलीभाऊ दाभाडे यांचे पक्षाकडून निलंबन, पक्ष शिस्त मोडून सुनिल शेळकेंना पाठींबा दिल्याने कारवाई
– मावळ विधानसभा क्षेत्रात मोठी कारवाई, तब्बल 17 लाख 75 हजारांची रोकड जप्त