Dainik Maval News : जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात एका ४० वर्षीय व्यक्तीची ४५ लाख रुपयांची फसवणूक केली. त्यानंतर संबंधित व्यक्तीवरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. हा गंभीर प्रकार ऑगस्ट २०२३ ते ३० मे २०२३ या कालावधीत मावळ तालुक्यातील परंदवडी सोमाटणे येथे घडला.
याप्रकरणी चाळीस वर्षीय व्यक्तीने शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी शैलेंद्र निवृत्ती निकाळजे (वय ५४, रा. गणेशखिंड, पुणे) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरगाव पोलिसांत आरोपीवर भा.द.वि. कलम ४२०, ४०६, ४६७, ४६८, ४७१, ३८४, ५०६, १९३(२), १९९, २०० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांना चांदखेड येथील गट नं. ३२६ मध्ये २ हेक्टर ९.१० आर क्षेत्र जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार पूर्ण न करता टाळाटाळ केली. व्यवहारादरम्यान वारसदारांबाबत खोटे प्रतिज्ञापत्र देवून फिर्यादीची फसवणूक केली. तसेच शेअर मार्केटमध्ये अधिक नफा मिळवून देतो असे सांगून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून आरटीजीएस आणि चेकद्वारे फिर्यादीकडून ४० लाख रुपये व जमिनीच्या खरेदी कामाचे विसार पावती दरम्यान ५ लाख रुपये असे एकूण ४५ लाख रुपये उकळले.
शेअर मार्केट मध्ये गुंतविलेल्या पैशाच्या बदल्यात ९९ लाख रुपयांच्या चेकवर फसवणूक करण्याच्या उद्देशाने अर्धवट सही करून फिर्यादी यांची फसवणूक केली. सोमाटणे येथील तलाठी कार्यालयात आरोपीने हरकत अर्ज दाखल केला. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीस, तुम्ही हरकत का घेतली अशी विचारणा केली. तेव्हा आरोपीने फिर्यादी यांना, तू मला अधिकचे ५० लाख रुपये दे नाही तर मी किंवा माझ्या भावंडातील लोकांना सांगून तुझ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून तुला अडकवेन आणि तु माझ्या नादी लागलास तर तुझी सुपारी देऊन तुझा काटा काढील. अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. शिरगाव पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक लोहेकर हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळात महायुतीत बंडखोरी ! सुनिल शेळके यांच्या विरोधात अनेक दिग्गज एकत्र । Maval Vidhan Sabha
– मावळ तालुक्यातील ताजे गावातील सख्ख्या भावांची शासकीय सेवेत निवड । Maval News
– राज्यात 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त, विविध विभागांच्या पथकांची राज्यभर कारवाई