Dainik Maval News : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील अनधिकृत होर्डिंगवर सोमवारी (दि.28) अधिकारी, पोलीस व लष्कराच्या बंदोबस्तामध्ये कारवाई करण्यात आली. यात सुमारे सात होर्डिंग काढण्यात आले, तर उर्वरित होर्डिंगवर मंगळवारी कारवाई करण्यात येणार आहे. तसेच काही होर्डिंग मालकांना दोन दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत अनेक इमारतींवर, रस्त्यांच्या बाजूला बेकायदेशीर तसेच अनधिकृत होर्डिंग्ज उभारण्यात आले होते. उच्च न्यायालय आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार बोर्डानी सर्व अनधिकृत होर्डिंग काढण्यासाठी होर्डिंग मालकांना वारंवार नोटिसा व सूचना बजावल्या होत्या. अखेर दोन दिवसांची मुदत देत गुरुवारी (दि.24) नोटीसा बजावल्या.
नोटीस बजावून देखील होर्डिंग काढण्यात आले नसल्याने सोमवारी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुष्पांजली रावत यांच्या आदेशानुसार अधिकृत होर्डिंग काढण्याची विशेष मोहीम राबविण्यात आली. पोलीस व लष्कराच्या बंदोबस्तामध्ये बोर्डाचे अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत गॅस वेल्डिंग कटर तसेच क्रेनच्या सहाय्याने होर्डिंग काढण्यात आले.
काही होर्डींग मालकांनी स्वतःहून होर्डींग काढून घेत असल्याचे सांगितल्याने त्यांना दोन दिवसाची मुदत देण्यात आली आहे. मुंबई-पुणे महामार्ग तसेच कात्रज-देहूरोड बाह्यवळण महामार्गावर आणि इमारतींवरील होर्डिंग तसेच होर्डिंगचे लोखंडी सांगाडे काढण्यात आले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई – बाबा मतदान करा… मावळ विधानसभा मतदारसंघात विद्यार्थ्यांकडून आई-बाबांना मतदानाचे आवाहन
– देवेंद्र फडणवीसांचा आदेश डावलला, बाळा भेगडे यांचा बापू भेगडेंना पाठींबा कायम, महायुतीच्या उमेदवाराचे काम करणार नाही !
– मोठी घडामोड ! भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना सोबत घेवून रविंद्र भेगडे यांनीही भरला उमेदवारी अर्ज । Maval Vidhan Sabha