Dainik Maval News : देहूगाव येथील कापूर ओढ्यावर श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. वनराई बंधाऱ्यामुळे भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ होणे, तसेच शेत शिवारातील विहिरी, बोअरवेल यांच्या पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. रब्बी हंगामातील पिकांना त्याचा निश्चितच फायदा होणार असून या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याचा जनावरांना पाणी पिण्यासाठी देखील उपयोग होणार आहे.
तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मोशी मंडल कृषी अधिकारी शिवाजी खटके यांच्या मार्गदर्शनाखाली देहू येथील कृषी सहाय्यक जयश्री पाडेकर यांच्या उपस्थितीत शेतकरी बांधव आणि योगा ग्रुप सदस्यांच्या श्रमदानातून हा बंधारा बांधण्यात आला.
कृषि मित्र पांडुरंग शेळके, भारत बहिरट, संताजी येळवंडे, संतोष बोत्रे, सतीश काळोखे, रवी काळोखे, विकास हगवणे, राजेंद्र काटे, प्रितम वरघडे, नारायण पचपिंड, श्रीरंग काळोखे, नंदकुमार विधाटे, ओंकार दीक्षित, सुभाष कंद, गणेश हगवणे, प्रवीण हगवणे, सागर हगवणे, गोवर्धन कंद, काळूराम रासकर, स्वामी कड, जालिंदर हगवणे यासह योगा ग्रुपचे सदस्य यावेळी श्रमदानासाठी उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावा ; विभागनिहाय आढावा बैठकीत आमदार सुनिल शेळकेंनी अधिकाऱ्यांना दिल्या सूचना
– आंदर मावळ विभागातील नागरिकांना मोठा दिलासा ! वडेश्वर येथे नवीन वीज उपकेंद्र उभारण्यासाठी निधी उपलब्ध
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक