Dainik Maval News : मावळ तालुक्याचे महसूल केंद्र असलेल्या वडगाव शहरात आता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरातील महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास सुरुवात झाली आहे. वडगाव शहरातील बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.
वडगाव मावळ हे तालुक्याचे ठिकाण असून तालुक्यातून मोठ्या संख्येने नागरिक दररोज येथे येत असतात. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, अशी मागणी अनेक सामाजिक, राजकीय संघटनांकडून होत होती.
वडगाव मावळ पोलीस स्टेशनकडून नगरपंचायतीकडे शहरातील महत्वाच्या व संवेदनशील ठिकाणी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार नगरपंचायत फंडातून सुमारे 1 कोटी 57 लक्ष इतका निधी याकरीता मंजूर करण्यात आला होता. मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या प्रयत्नातून व नगरपंचायतच्या मार्फत उपलब्ध फंडातून हे काम होत आहे.
पहिल्या टप्प्यात शहरातील पंचायत समिती चौक, वडगाव न्यायालय, श्री पोटोबा महाराज मंदिर, जामा मस्जिद परिसर, भाजी मंडई, खंडोबा चौक, महादजी शिंदे उद्यान याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. यानंतर पुढील काही दिवसात कातवी, विशाल लाॅन्स, माळीनगर, न्यू इंग्लिश स्कूल, केशवनगर यांसह इतर काही मुख्य चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनिल शेळके इन ‘अॅक्शन मोड’ ! मावळ मतदारसंघातील सर्व पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांची घेतली संयुक्त बैठक
– जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करा ; आमदार शेळकेंची अधिकारी व ठेकेदारांना तंबी
– गांजा बाळगल्याप्रकरणी तरूणाला अटक, गहुंजे हद्दीत पोलिसांची कारवाई, 20 लाखाचा मुद्देमाल जप्त । Maval Crime