Dainik Maval News : श्री दत्त जयंतीनिमित्त ‘श्री गगनगिरी महाराज पायी ज्योत पुनावळे ते खोपोली’ या पायी ज्योतीचे वडगाव येथील खंडोबा मंदिर चौकात उत्साहात स्वागत करण्यात आले. संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव व वडगाव विकास सोसायटीचे चेअरमन किसनराव वहिले यांनी ज्योतीस पुष्पहार अर्पण करुन स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवक अध्यक्ष विशाल वहिले यांनी आलेल्या मान्यवरांचे व भाविकांचे स्वागत केले. यावेळी जय मल्हार ग्रुपकडून आलेल्या भाविकांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती.
याप्रसंगी श्री दत्त गगनगिरी सेवा मंडळाचे मार्गदर्शक व संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक चेतन भुजबळ, पुणे जिल्हा राष्ट्रवादी (श.प.) ओबीसी सेलचे अध्यक्ष अतुल राऊत, कामगार नेते हेमंत कोयते, महेंद्र म्हाळसकर, ॲड अजित वहिले, सोमनाथ धोंगडे, बाळासाहेब शिंदे, सौरभ सावले, तुषार वहिले, संदिप वहिले, रोहित गिरमे, संतोष देशमुख, कैलास पाटोळे, ओम नायडू, विराज वहिले उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद टाकवे बुद्रुक शाळेचे वर्चस्व । Maval News
– मळवंडी ठुले येथे केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न, पाहा संपूर्ण निकाल
– वारु व ब्राम्हणोली गावातील जेष्ठ नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर, 108 ग्रामस्थांची आरोग्य तपासणी