Dainik Maval News : पुणे रिंग रोड प्रकल्प हा पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहराची वाहतूक कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातूनच पुणे रिंग रोड प्रकल्पाचे आरेखन पुणे जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले. परंतु अद्याप देखील पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक असलेले 200 हेक्टर भूसंपादन प्रलंबित आहे, अशी माहिती समोर आली आहे.
पुणे रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या एकूण 1740 हेक्टर पैकी सुमारे एक हजार तीनशे हेक्टर क्षेत्राचे संपादन करण्यात आले आहे व अजून 200 हेक्टर जमिनीचे संपादन प्रलंबित आहे. यामध्ये पूर्व विभागातील 143 हेक्टर आणि पश्चिम विभागातील 63 हेक्टरचे भूसंपादन अजून बाकी आहे. उर्वरित संपादनामध्ये पूर्व भागातील पुरंदर, भोर तसेच हवेली, मुळशी आणि मावळ तालुक्यांचा आणि पश्चिम विभागातील खेड आणि मावळ तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे आता 15 डिसेंबर पर्यंत स्वच्छेने भूसंपादनाचा म्हणजे जमिनीचा ताबा देणाऱ्या जमीन मालकांना 25 टक्के भरपाई मिळेल, तर पंधरा डिसेंबरनंतर भूखंडाचे अधिग्रहण करण्याकरिता जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या जमिनींचे अद्याप संपादन झालेले नाही अशा 200 हेक्टर भूसंपादनासाठी जवळपास पाचशे कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. या निधीचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे पाठवण्यात आलेला आहे.
पुणे रिंग रोड प्रकल्प –
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून पुणे रिंगरोड प्रकल्प महत्त्वाचा आहे. 2022 मध्ये प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. पुणे रिंग रोड प्रकल्पाचे काम हे पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांमध्ये विभागण्यात आले आहे. यातील पूर्व भागातील रिंग रोड मावळ, मुळशी तसेच खेड, हवेली आणि पुरंदर तालुक्यातून जाणार आहे. तर पश्चिम रिंग रोडची सुरुवात उर्से पासून ते पुणे बेंगलोर महामार्गावरील खेड शिवापुर पर्यंत असेल. पूर्व भागातील 46 गावे तर पश्चिम भागातील 37 गावांमधून हा रिंग रोड जाणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कार्ला लेणी परिसरात स्वच्छता अभियान ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण सप्ताह संपन्न । Karla News
– एक हजार विद्यार्थ्यांनी केले भगवद्गीतेचे पठण ; ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये गीता जयंती साजरी । Lonavala News
– लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन । Lonavala News