Dainik Maval News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा विजय प्राप्त झाला. तर शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. या दरम्यान शरद पवार यांच्या वाढदिवसाला अजित पवार सहकुटुंब आणि सर्व प्रमुख सहकाऱ्यांसमवेत शरद पवार यांना भेटले. त्यानंतर सुरु झालेल्या विविध चर्चांदरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या एका विधानाची राज्यभर चर्चा होत आहे.
आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर आश्चर्य वाटू देऊ नका, असे आमदार सुनिल शेळके म्हणाले आहेत. सहा महिन्यांपूर्वी जे नेते अजित पवारांवर टीका करत होते. भर सभेत म्हणत होते. काका मला वाचवा, आता तेच नेते दादा मला वाचवा असं म्हणत आहेत, असेही शेळके म्हणाले. तळेगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलत असताना आमदार शेळके यांनी हे विधान केले.
पुढे ते म्हणाले, आगामी काळात राष्ट्रवादी एक संघ होत असेल आणि हातात हात घालून काम करत असेल तर आम्हाला देखील आनंद आहे. परंतु, अडचणींच्या काळात अजित पवारांसोबत राहिले त्यांना देखील विश्वासात घेतले पाहिजे. आमच्यासोबत जे कोणी येतील त्यांचं स्वागत करू, अस देखील शेळके यांनी अधोरेखित केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– कार्ला लेणी परिसरात स्वच्छता अभियान ; डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण सप्ताह संपन्न । Karla News
– एक हजार विद्यार्थ्यांनी केले भगवद्गीतेचे पठण ; ॲड. बापूसाहेब भोंडे हायस्कूलमध्ये गीता जयंती साजरी । Lonavala News
– लोणावळ्यात वंचित बहुजन आघाडीचे ईव्हीएम मशीन विरोधात आंदोलन । Lonavala News