Dainik Maval News : परभणी येथील संविधान शिल्प विटंबना प्रकरणाचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत असताना पवन मावळ विभागाची प्रमुख बाजारपेठ असलेल्या पवनानगर येथे सोमवारी बंद पाळण्यात आला. आरपीआय पक्षाकडून या बंदची हाक देण्यात आली होती.
परभणी येथे 10 डिसेंबर रोजी घडलेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटंबना प्रकरणी पवनानगर बाजारपेठेत सोमवारी (दि. 16 डिसेंबर) बंद पुकारण्यात आला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे (आठवले गट) तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंद पुकारण्यात आला होता.
यावेळी सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या 35 वर्षीय तरुणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला. तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांस सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
तालुकाध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी मार्गदर्शन करताना, घटनेतील मुख्य आरोपीला कठोर शासन व्हावे. मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला जावा. तसेच सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस जबाबदार दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशी मागणी केली.
यावेळी ज्ञानदेव सोनवणे, मल्हारी घोडके, अंकुश सोनवणे, अतुल सोनवणे, उत्तम चव्हाण, नितीन बुटाला, अरविंद रोकडे, दीपक यादव, अनिल भालेराव, शरद सोनवणे, मंगेश कदम, प्रशांत भालेराव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी
– जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन । Zakir Hussain Passes Away
– वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे नव्या वास्तूत स्थलांतर ! तब्बल 135 वर्षे सुरू होते जुन्या इमारतीमध्ये कामकाज
– महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस