Dainik Maval News : फेडरेशन ऑफ मोटर स्पोटर्स क्लब्स ऑफ इंडिया (एफएमएससीआय) मान्यतेखाली पार पडलेल्या इंडियन नॅशनल रॅली स्प्रिंट चॅम्पियनशीप स्पर्धेत गुजरातच्या टीम-2 संघाने राष्ट्रीय सांघिक विजेतेपद संपादन केले. राजेंद्र, सिनान फ्रान्सीस, वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद आणि आसिफ अलि सय्यद यांनी आपापल्या गटामध्ये विजेतेपद संपादन केले.
कामशेत जवळील नाणोली स्पीड-वे फार्म्स येथे झालेल्या निर्णायक फेरीमध्ये साडेपाच किलोमीटरच्या धावपट्टीमध्ये रॅली-रेसर्सच्या दोन शर्यती घेण्यात आल्या. या दोन्ही शर्यती मिळून सरासरीतील सर्वोत्तम वेळची नोंद करण्यात आली. ओपन अपटू ५०० सीसी ग्रुप सी१ क्लास मध्ये राजेंद्र आरई याने पहिला क्रमांक मिळवला. क्लास सी१-ओपन अपटू ५५० सीसी (प्रायव्हेट) मध्ये सिनान फ्रान्सीस याने सर्वोत्तम वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. वरूण कुमार, डी. सचिन, हेमंत गोड्डा, सुहेल अहमद यांनी आपापल्या गटामध्ये सर्वोत्तम वेळेसह पहिला क्रमांक मिळवला. महिला गटामध्ये रेहान बी. हिने, प्रौढ गटामध्ये एम.डी. सईद आणि स् कूटर २१० सीसी क्लास मध्ये आसिफ अलि यांनी विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण ‘युरोग्रीप’ टायर उत्पादक कंपनीचे विभागीय व्यवस्थापक फराझ शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एफबी मोटरस्पोटर्सचे संचालक फराद भाथेना आणि चिन्मयी भाथेना उपस्थित होते. सर्व विजेत्यांना करंडक आणि प्रशस्तीपत्रक देण्यात आले.
या फेरीमध्ये देशातील 70 रायडर्सनी सहभाग घेतला होता. चैन्नई, बंगलोर, कोईमतुर, भोपाळ, गुवाहाटी, तामिळनाडूमधील ईरोड, त्रिसुर आणि कुर्ग, आसाम, कर्नाटक, केरळमधील एर्नाकुलम, शिमागोज, जयपुर या राज्यांतुन रायडर्स सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील पुण्यामधून किशोर जाधव, मोहन सेठीया, पुरूषोत्तम मते, कुणाल सिंग, नितीश चौधरी, दानेश जोशी, पंकज ठक्कर, आदित्य राजपुत, बारामतीमधून रोहीत शिंदे, सांगलीमधून अजित पाटील, नाशिक मधून दर्शन चावरे, बादल दोशी (नवी मुंबई) असे अव्वल रायडर्स सहभागी झाले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी 33 मंत्री व 6 राज्यमंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ, एका क्लिकवर पाहा यादी
– जगप्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन । Zakir Hussain Passes Away
– वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे नव्या वास्तूत स्थलांतर ! तब्बल 135 वर्षे सुरू होते जुन्या इमारतीमध्ये कामकाज
– महाराष्ट्रात आजपासून गतिशील कारभार सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस