Dainik Maval News : मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर अज्ञात वाहनाच्या धडकेत एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मंगळवारी (दि.17 डिसेंबर) रात्री अंदाजे अकरा ते साडेअकरा वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावर पिंपळोली बोगद्याजवळ ही घटना घडली. द्रुतगती मार्ग किलोमीटर 68 वर पुणे मार्गिकेवर अपघात घडला. भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने पूर्ण वाढ झालेल्या बिबट्याला धडक दिली. यात गंभीर जखमी होऊन बिबट्या मृत पावला. वडगाव मावळ वनविभागाच्या हद्दीतील ही घटना आहे.
सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर आयआरबी, वाहतूक पोलीस व वडगाव वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वन अधिकारी श्रीमती ढोमे व त्यांच्या टीमने प्रक्रियेनुसार घटनेचा पंचनामा केला आणि मृत बिबट्याचे शव ताब्यात घेतले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यावर कठोर कारवाई व्हावी ; आरपीआयचे तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांना निवेदन
– परभणी घटनेच्या निषेधार्थ पवनानगर बंद ! आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी । Pavananagar
– बनावट घड्याळ विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा दाखल, देहूरोड येथील घटना । Maval Crime