Dainik Maval News : श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात संपन्न झाला. दीपप्रज्वलन व सरस्वती प्रतिमा पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा प्रशिक्षक श्याम भोसले उपस्थित होते. तर, श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे, उपाध्यक्ष दादासाहेब उरे, सचिव मिलिंद शेलार, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, मुख्याध्यापक रावसाहेब शिरसट व अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वैयक्तिक व सांघिक स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पदक देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी चिकाटी, जिद्द, परिश्रमाने क्रीडा क्षेत्रात पारंगत होऊन विजयी व्हावे, असे भोसले यांनी मनोगतात सांगितले. जीवनातील ताणतणाव, थकवा, आळस दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळाची आवड जोपासावी. खेळामुळे एकता व सहकार्याची भावना निर्माण होते, असे विचार रजनीगंधा खांडगे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक शिरसट, पर्यवेक्षिका रेणू शर्मा, क्रीडा प्रमुख प्रशांत भालेराव, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली कांबळे आणि स्नेहल कुडाळकर यांनी केले. स्तुत्य उपक्रमाचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कौतूक करून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– विद्यार्थ्यांची पायपीट थांबणार ! कुरवंडे येथील 42 शालेय विद्यार्थ्यांना सायकल वाटप । Maval News
– अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू, पिंपळोली गावच्या हद्दीतील घटना । Maval News
– भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
– कुसवलीतील सहारा वृद्धाश्रमात रंगली अनुभवाच्या कवितांची व मुक्त संवादाची मैफल । Maval News