केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिनांक 1 जानेवारी 2023 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार नव मतदारांची 100 टक्के मतदार नोंदणी करण्यासाठी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मेगा कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. ( Campaign For New Voter Registration in Maval Taluka Pune )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रारूप मतदार यादी दिनांक ही 9 नोव्हेंबर 2022 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेमध्ये दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्ष वय पूर्ण होणारे नागरिक यांना मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे पात्र नव मतदारांची 100 टक्के मतदान नोंदणी करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी पुणे यांनी पुणे जिल्ह्यातील एकूण 583 महाविद्यालयांमध्ये दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी मेगा कॅम्पचे आयोजन केले आहे.
जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडील निर्देशानुसार सदर महाविद्यालयांमध्ये संबंधित महाविद्यालयातील एक समन्वय अधिकारी व एक बीएलओ किंवा तलाठी यांची नेमणूक करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्यानुसार 204 मावळ विधानसभा मतदारसंघातील दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी मेगा कॅम्पसाठी समन्वयक अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. संबंधित अधिकारी कर्मचारी संबंधित महाविद्यालयातील समन्वयक अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ते नियोजन करतील, असे आदेश देण्यात आले आहेत.
आवश्यक नमुना अर्ज संबंधित महाविद्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात यावेत, तसेच दिनांक 25 नोव्हेंबर 2022 रोजी मेगा कॅम्पला संबंधित महाविद्यालयामध्ये उपस्थित राहून जास्तीत जास्त नवं मतदारांची नोंदणी करून घ्यावी, असे निर्देश सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (204 मावळ विधानसभा मतदारसंघ तहसीलदार मावळ) यांच्याकडून देण्यात आले आहेत.
पवनमावळमधील नव मतदारांसाठी…
शुक्रवारी दिनांक 25 नोव्हेंबर रोजी मावळ तालुक्यातील पवनमावळ/ पवनानगर-काले कॉलनी भागात मेगा कॅम्प आयोजित करण्यात येत आहेय. शिळिंब, आजिवली, जवण, वाघेश्वर, गेव्हंडे खडक या गावांतील पात्र मतदार यांनी आवश्यक दस्तावेज घेऊन सदर ठिकाणी हजर राहून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे.
अधिक वाचा –
– कुटुंबातील कुणी कर्जदार व्यक्ती कोरोनाने गेला असल्यास ही बातमी नक्की वाचा, सहकार विभागाचा दिलासादायक निर्णय
– लव्ह मॅरेजनंतरही दुसरीवर जीव जडला, दुसऱ्यांदा लव्ह मॅरेज करण्यासाठी पत्नीसोबत केले भयानक कृत्य