Dainik Maval News : केंद्र शासन व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा रविवारी (दि.२२) मावळ तालुक्यातील लोणावळा व तळेगाव केंद्रावर संपन्न झाली. या परीक्षेत मावळमधील एकूण ८२० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ही परीक्षा आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी घेतली जाते. या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक १२००० रुपये शिष्यवृत्ती मिळते. ही शिष्यवृत्ती ८ वी ते १२ वी पर्यंत सलग चार वर्षे मिळते.
लोणावळा येथील व्हीपीएस माध्यमिक शाळेत, तर तळेगाव येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेमध्ये ही परीक्षा पार पडली. दोन्ही ठिकाणी मावळातील ४८ शाळांमधील ८२० विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षेचे नियोजन मावळ तालुका गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळूंज यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
परीक्षेसाठी मावळ तालुक्यातील केंद्रप्रमुख सविता क्षीरसागर व दहीतुले मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली भरारी पथक गठीत करण्यात आले होते. तळेगाव दाभाडे केंद्राचे प्रमुख म्हणून केंद्र संचालक रेखा श्यामशिंग परदेशी यांनी काम पाहिले, तर लोणावळा केंद्राचे प्रमुख म्हणून उदय महेंद्रकर, गजेंद्र गडकर, केंद्र समन्वयक रवींद्र गोसावी, मोहन ढाणे, विजय रसाळ यांनी काम पाहिले.
नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, सदस्य दामोदर शिंदे, महेशभाई शहा, सोनबा गोपाळे, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड व मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे त्याचप्रमाणे मुख्याध्यापिका वासंती काळोखे यांनी विद्यार्थ्यांना केंद्रावर जाऊन शुभेच्छा दिल्या.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई-वडिलांच्या भांडणाला घाबरून चिमुकलीने घर सोडले ; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी पुन्हा सुखरूप परतली । Talegaon News
– रब्बी हंगामातील पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम, थेट शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
– घराच्या बांधकामावरून लाकडी दांडक्याने जबर मारहाण ; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime