Dainik Maval News : कामशेत शहरातील विविध शाळांच्या आवारात विद्यार्थ्यांकडून अनेक अनुचित प्रकार घडत असून शाळा सुटताना व भरताना होणारे वादविवाद, मारामारी असे वाढते प्रकार लक्षात घेता पोलिसांनी गस्त घालणे आवश्यक असल्याची मागणी सह्याद्री विद्यार्थी अकादमी संस्थेकडून करण्यात आली आहे. याबाबत कामशेत पोलीस ठाण्यात लेखी निवेदन देण्यात आले आहे.
शाळेतील अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना ट्रिपलसीट जाणे, जोरात गाडी चालविणे, कर्नकर्कश हॉर्न वाजविणे असे प्रकार करताना दिसून येतात. तर दुसरीकडे टवाळखोर मुले शाळा भरताना व शाळा सुटताना शालेय आवारात टाइमपास करीत असतात. यासह मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढत असल्याच्या तक्रारी वाढत असून सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
शाळा व कॉलेज भरताना व सुटताना दोन पोलीस कर्मचारी शाळेच्या आवारात बंदोबस्तासाठी नेमावेत, असे निवेदन देण्यात आले. यावेळी सह्याद्री विद्यार्थी अकादमीचे केदार डाखवे, सचिन शेडगे, चेतन वाघमारे, वैभव हजारे, अनिश शर्मा, सुभाष भोते उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई-वडिलांच्या भांडणाला घाबरून चिमुकलीने घर सोडले ; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी पुन्हा सुखरूप परतली । Talegaon News
– रब्बी हंगामातील पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम, थेट शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
– घराच्या बांधकामावरून लाकडी दांडक्याने जबर मारहाण ; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime