व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, January 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट

खासदार श्रीरंग बारणे यांनी घेतली जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट

Team Dainik Maval by Team Dainik Maval
December 24, 2024
in लोकल, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, शहर, शहर
MP Shrirang Barne demand to make Pimpri-Chinchwad a Water Plus City

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड शहराच्या चारही बाजूंनी उद्योग, कारखाने आहेत. त्यामुळे लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत असून पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. तसेच कारखान्यांमधील रसायनमिश्रित पाण्यामुळे इंद्रायणी, पवना नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा गंभीर झाला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारण्याची आवश्यकता आहे. पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधी देण्याची मागणी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र सरकारकडे केली.

खासदार बारणे यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी.आर. पाटील यांची भेट घेत निधी देण्याची मागणी केली. खासदार बारणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहर पुण्याच्या ईशान्येस आणि मुंबईच्या आग्नेय बाजूस 160 किलोमीटर अंतरावर आहे. उत्तरेकडे चाकण औद्योगिक क्षेत्र म्हणजेच भारतातील ऑटोमोबाईल आणि सहायक उद्योग केंद्र आहे. ईशान्येकडे तळेगाव दाभाडे एमआयडीसी आणि दक्षिणेकडे हिंजवडी आयटी पार्क आहे. शहर लष्करी क्षेत्र आणि छावणीने वेढलेले आहे. ईशान्येला देहू कॅन्टोन्मेंट आहे आणि दक्षिणेला लष्करी क्षेत्राचे दोन मोठी क्षेत्रफळे आहेत. उद्योगांमुळे शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पिंपरी-चिंचवडमधील 60 टक्यांपेक्षा जास्त लोकसंख्या वाढ रोजगाराच्या संधीच्या स्थलांतरामुळे झाली आहे. सद्यस्थितीत शहराची लोकसंख्या 30 लाखाच्या घरात गेली आहे.

शहराला पवना धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी महापालिकेने 333 एमएलडी क्षमतेचे 13 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारले आहेत. भविष्यातील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेने इकोसिस्टम स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या उपक्रमामुळे शहराच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध पाण्याच्या स्त्रोतांवरील मागणी आणि ताण लक्षणीयरीत्या कमी होईल.

जलप्रदूषण कमी करून जलस्रोतांचे संरक्षण होईल. प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुरवठा खर्चाच्या तुलनेत स्वस्त आहे. महापालिका कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंगच्या सहकार्याने 45 एमएलडी क्षमतेचे एसटीपी उभारत आहे. सांडपाण्यावर तृतीय स्तरापर्यंत प्रक्रिया करण्याची योजना आखत आहे. त्यामुळे पुनर्वापर केलेले पाणी विविध उद्योगांना त्यांच्या वापरासाठी पुरवठा करता येईल. महापालिकेने 15 जानेवारी 2014 रोजी राष्ट्रीय नदी संवर्धन संचालनालय, जलशक्ती मंत्रालय यांच्याकडे प्रदूषण कमी करणारे प्रकल्प राबविण्यासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 60 टक्के निधी मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत सांडपाणी पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी निधी देऊन सहकार्य करण्याची विनंती खासदार बारणे यांनी केली आहे.

‘वॉटर प्लस सिटी’ म्हणजे काय?
नदी, नाल्यामध्ये काळे, रसायनमिश्रित पाणी जाऊ नये. नदी स्वच्छ वाहिली पाहिजे. नदी, नाले स्वच्छ असलेल्या शहराला ‘वॉटर प्लस सिटी’ प्रमाणपत्र दिले जाते.

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत इंद्रायणी नदीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करा
महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने 22 सप्टेंबर 2023 रोजी इंद्रायणी नदीच्या संवर्धनासाठीचा प्रकल्प अहवाल सादर केला आहे. राष्ट्रीय नदी संवर्धन योजने अंतर्गत इंद्रायणी नदीचे पुनरुज्जीवन आणि संवर्धन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी. इंद्रायणी नदीचे पुनरुज्जीवन पुणे महानगर प्रदेशाच्या पर्यावरणीय शाश्वतता आणि कल्याणासाठी महत्त्वपूर्ण आहे. वेळेवर मंजुरी मिळाल्याने नदीचे पर्यावरणीय संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी आवश्यक पावले उचलणे शक्य होईल. हा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्याची मागणीही खासदार बारणे यांनी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत योग्य ते निर्देश देण्याची ग्वाही मंत्री पाटील यांनी दिली.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आई-वडिलांच्या भांडणाला घाबरून चिमुकलीने घर सोडले ; वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मुलगी पुन्हा सुखरूप परतली । Talegaon News
– रब्बी हंगामातील पिकांचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी कृषी विभागाची मोहीम, थेट शेताच्या बांधावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन
– घराच्‍या बांधकामावरून लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण ; मावळ तालुक्यातील धक्कादायक घटना । Maval Crime 


Previous Post

तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News

Next Post

विद्युत रोहित्र जोडण्यास महावितरणकडून दिरंगाई ! टाकवे बुद्रुकसह परिसरातील गावांना नाहक त्रास । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Delayed by Mahavidran to connect electricity grid

विद्युत रोहित्र जोडण्यास महावितरणकडून दिरंगाई ! टाकवे बुद्रुकसह परिसरातील गावांना नाहक त्रास । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

NCP members elected unopposed as chairmen of committees other than planning committee in Lonavala Municipal Council

लोणावळा नगरपरिषदेत नियोजन समिती वगळता इतर समित्यांच्या सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बिनविरोध निवड

January 24, 2026
Karla Khadkala Zilla Parishad Group Maval Deepali Hulawale nominated by NCP

विकासाभिमुख नेतृत्व म्हणून कार्ला – खडकाळा जिल्हा परिषद गटात दीपाली हुलावळे यांच्या नावाची चर्चा !

January 23, 2026
Kusgaon Budruk Kale Zilla Parishad group BJP likely to confirm Bhausaheb Gund candidacy

दत्तात्रय उर्फ भाऊसाहेब गुंड यांना भाजपाकडून कुसगांव बुद्रुक – काले जिल्हा परिषद गटाची अधिकृत उमेदवारी ; कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

January 23, 2026
name of BJP official candidate Ashatai Waikar is in news in Karla-Khadkala Zilla Parishad group

कार्ला-खडकाळा गटाच्या विकासासाठी आशाताई वायकर यांचे गणरायाला साकडे !

January 23, 2026
NCP opens campaign rally in Induri-Varale group Voters respond enthusiastically to campaign rally

राष्ट्रवादीने इंदुरी-वराळे गटात फोडला प्रचाराचा नारळ ! नवलाख उंबरे गावात प्रचार रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

January 23, 2026
Bajaj Pune Grand Tour 2026 Luke Madgwe dominates Mulshi-Maval stage Harshveer Singh best Indian cyclist

बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ : मुळशी–मावळ टप्प्यात ल्यूक मडग्वेचे वर्चस्व ; हर्षवीर सिंग सर्वोत्तम भारतीय सायकलपटू

January 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.