Dainik Maval News : ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने शिरगाव (ता. मावळ) येथे सोमवारी (दि.23) मोठा अपघात झाला. सोमवारी दुपारी सुमारास ही घटना घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरगाव येथून सोमाटणे फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावर ट्रक (क्रमांक एमएच 42 बीएफ 9277) वरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. ट्रक रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. या ट्रकमधून सिमेंटच्या विटांची वाहतूक केली जात होती.
अपघात झाल्यानंतर ट्रकमधील विटा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर पडल्या. यामध्ये वाहनांचे खूप प्रमाणात नुकसान झाले. एका दुकानासमोर हा ट्रक पलटी झाला. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. ट्रक दुकानात घुसला असता किंना रस्त्याने जाणाऱ्या वाहनांवर पलटी झाला असता तर काहींचे जीव गेले असते, अशी चर्चा होत आहे.
घटनेची माहिती मिळताच तळेगाव दाभाडे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस पुढील तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार