Dainik Maval News : राज्यात यंदा नाताळ सण आणि नव वर्षाचे स्वागत दणक्यात करता येणार आहे. राज्याच्या गृहविभागाने दिलेल्या नव्या आदेशानुसार दिनांक 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या रात्री हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, परमिट रूम्स, आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे आणि नागपूर सारख्या शहरात यंदाचा ख्रिसमस आणि थर्टी फर्स्ट जोरदार साजरा होणार असल्याचे दिसत आहे.
मद्य विक्रीसाठी विशेष वेळापत्रक :
वाईन शॉप्स : मध्यरात्री 1 वाजेपर्यंत सुरू राहणार
बीअर बार : पहाटे 5 वाजेपर्यंत खुले राहणार
आउटडोअर म्युझिक कॉन्सर्ट – तिन्ही दिवशी म्हणजेच 24, 25 आणि 31 डिसेंबरला रात्री 12 वाजेपर्यंतच आउटडोअर संगीत मैफलींसाठी परवानगी असेल.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि बार चालकांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. यामुळे नागरिकांना ख्रिसमस आणि नववर्षाच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत आपल्या मित्रमंडळींसोबत सेलिब्रेशन करण्याची संधी मिळणार आहे. पोलिसांकडून या काळात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवण्यास कडक मनाई करण्यात आली असून, ट्रॅफिक पोलिसांच्या पथकांकडून तपासणी केली जाणार आहे.
काय आहे आदेश ? पाहा सविस्तर
राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी विशेषतः 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत लागू असेल. इंडियन हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी यांनी 10 डिसेंबर 2024 रोजी शासनाला या संदर्भात विनंती केली होती. या मागणीचा विचार करून शासनाने नाताळ आणि नववर्षाच्या विशेष प्रसंगी लोकांना आनंद साजरा करता यावा यासाठी ही सवलत मंजूर केली आहे.
राज्यातील खाद्यगृह, हॉटेल, रेस्टॉरंट, परमीट रूम आणि ऑर्केस्ट्रा बार पहाटे 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी विशेषतः 24, 25 आणि 31 डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशीपर्यंत लागू असेल. प्रशासनाकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. ही सवलत मिळाल्याने हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. वाढीव वेळेमुळे ग्राहकांना त्यांच्या कुटुंबीयांसह किंवा मित्रमंडळीसोबत नाताळ व नववर्षाच्या संध्याकाळी अधिक वेळ घालवता येणार आहे.
एरव्ही रात्री 1.30 पर्यंत हॉटेल, बार सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र, 24, 25 आणि 31 डिसेंबर या तीन दिवशी पहाटे पाचवाजेपर्यंत परमीट रुम, ऑर्केस्ट्रा बार, बीयर बार सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. शहरी भागात पहाटे 5 पर्यंत तर ग्रामीण भागात 1 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. तसेच या तीन दिवशी शहरी भागात वाईन शॉप रात्री 1 वाजेपर्यंत तर ग्रामीण भागात रात्री 11 पर्यंत खुली राहणार आहेत. खुल्या जागी होणाऱ्या संगीत रजनीसाठी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत परवानगी देण्यात येणार असल्याने नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्ध्या जोरात रंगणार आहेत. मात्र, सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास दिलेली वेळ शिथिल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. दरम्यान, 31 डिसेंबरच्या निमित्ताने अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभागांच्या पथकांचे लक्ष असणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार