Dainik Maval News : नाशिक येथे पाचवी महाराष्ट्र राज्य मास्टर गेम्स क्रीडा स्पर्धा 2024, मीनाताई ठाकरे क्रीडा संकुल मैदानावर पार पडली. दिनांक 14 ते 15 डिसेंबर दरम्यान या स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत देहुरोड (ता. मावळ) येथील खेळाडू अविनाश शिवाजी भंडारे वयोगट 45+गटात 100 मीटर धावणे (वेळ 12.96) सुवर्ण मेडल व बॅटमिंटन मध्ये ब्रॉन्झ मेडल मिळाले.
रेणू अवनीश शर्मा वयोगट 45+ गटात हतोडा फेक मध्ये सुवर्ण मेडल, गोळा फेक मध्ये रौप्य मेडल व भाला फेक मध्ये रौप्य मेडल मिळाले. पुनम देवकाते वयोगट 30+ गटात लांब उडी मध्ये सुवर्ण मेडल, 1500 मीटर धावणे मध्ये रौप्य मेडल व थाळी फेक मध्ये रौप्य मेडल मिळाले.
तिनही खेळाडू हे देहूरोड (ता. मावळ) येथील रहिवासी असून त्यांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे. तसेच त्यांची 2025 मध्ये ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार