Dainik Maval News : अॅड. पु.वा. परांजपे विद्यामंदिर, तळेगाव दाभाडे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे सचिव संतोष खांडगे, तर प्रमुख वक्ते म्हणून राजेंद्र घावटे उपस्थित होते. वार्षिक स्नेहसंमेलनाचे ध्वजारोहण विलास काळोखे यांच्या हस्ते झाले. चित्रकला व हस्तकला दालनाचे उद्घाटन मिलिंद शेलार, रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसाद पादीर, विज्ञान व गणित दालनाचे उद्घाटन शंकर नारखेडे यांच्या हस्ते करण्यात आले.
भविष्यात प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जपत स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे मत संतोष खांडगे यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी भविष्यवेधी शिक्षण घेण्याचे तसेच क्रांतिकारकांच्या कार्याचा वसा व वारसा जतन करण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नंदादीप या हस्तलिखिताचे प्रकाशन कार्यक्रमाचे खांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
क्रांतीरत्न विष्णू गणेश पिंगळे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या विद्यार्थी रत्न पुरस्काराचे वितरण इयत्ता दहावीतील प्रथम तीन क्रमांक, राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झालेल्या ईश्वरी झिंजुरके या विद्यार्थिनीचा विशेष सन्मान, बौद्धिक व क्रीडा स्पर्धेतील बक्षिसांचे वितरण करण्यात आले. प्रसाद पादिर यांनी भविष्यात विद्यार्थ्यांना कंपनीच्या माध्यमातून शैक्षणिक मदत करण्याचे आश्वासन दिले. मिलिंद शेलार यांनी कला ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याचे नमूद केले. बक्षिसपात्र गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांनी विविध शालेय स्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन केले, या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ दिनांक 20 डिसेंबर रोजी संपन्न झाला. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून इतिहास संशोधक डॉ. प्रमोद बोराडे उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून किरण ओसवाल, सत्यजित खांडगे, बसप्पा भंडारी, मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, रेखा भेगडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन मुख्याध्यापक, शिक्षक प्रतिनिधी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार