Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचलित आदर्श विद्या मंदिर प्राथमिक विभाग तसेच आदर्श बाल मंदिराचा वार्षिक पारितोषिक वितरण विविध गुणदर्शन कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या प्रशासन अधिकारी शिल्पा रोडगे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्त कलादालनाच्या उद्घाटनाने व ईशस्तवनाने झाली. त्यावेळी संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे, सहसचिव वसंत पवार व सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रस्ताविक वसंत पवार यांनी केले. आदर्श पूर्व प्राथमिकचे अहवाल वाचन वैशाली इनामदार तर प्राथमिक विभागाचे अहवान वाचन प्रतिज्ञा मांडे यांनी केले.
शिल्पा रोडगे यांनी पालकांनी व मुलांनी मोबाईलचा वापर करणे टाळावे, हा कानमंत्र दिला तसेच मुलांना बोधकथा सांगितली. अध्यक्षीय भाषणात यादवेंद्र खळदे यांनी ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, हे द्रोणाचार्य व शिष्य यांच्या गोष्टीतून सांगितले. तसेच पाहुणे रामनाथ गराडे यांनी मोबाईलचा वापर किती घातक आहे. हे एका प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थी व पालक यांना सांगितले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध खेळात नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले. तनिषा नरेंद्र वैरागी हिला शंभर टक्के उपस्थितीचे पारितोषिक देण्यात आले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार