Dainik Maval News : भारताचे माजी पंतप्रधान, अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (दि.26 डिसेंबर) वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. वृद्धापकाळाने त्यांची दिल्लीतील एम्स रुग्णालयात प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने अवघ्या देशावर शोककळा पसरली आहे. त्यामुळे आज, शुक्रवार (दि. 27 डिसेंबर) आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
मनमोहन सिंग यांना गुरुवारी रात्री 8 वाजता आपत्कालीन परिस्थिती दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रात्री 9.51 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी मनमोहन सिंग यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या आहेत. माझे आदर्श हरपल्याची भावना राहुल गांधींनी व्यक्त केली आहे.
शुक्रवारी, दिनांक 27 डिसेंबर रोजी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येणार आहे. आज 11 वाजता यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
India mourns the loss of one of its most distinguished leaders, Dr. Manmohan Singh Ji. Rising from humble origins, he rose to become a respected economist. He served in various government positions as well, including as Finance Minister, leaving a strong imprint on our economic… pic.twitter.com/clW00Yv6oP
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2024
मनमोहन सिंग यांची प्रदीर्घ राजकीय कारकीर्द
मनमोहन सिंग 33 वर्षे खासदार होते. विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जायचे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते जे 10 वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. 2004 ते 2014 असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच 1998 ते 2004 या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.
1991 मध्ये डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती. तसंच युपीएच्या काळात म्हणजेच 2004 ते 2014 या कालावधीत ते सलग दोन टर्म म्हणजेच 10 वर्षे देशाचे पंतप्रधान होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार