Dainik Maval News : नवलाख उंबरे व सुदुंबरे याठिकाणी नुकत्याच संपन्न झालेल्या यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सवाअंतर्गत तळेगाव बीटस्तरीय स्पर्धेत आंदर मावळातील कोंडीवडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले. या स्पर्धेत नवलाख उंबरे, इंदोरी, टाकवे व भोयरे केंद्रातील विविध स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
कोंडीवडे येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी भजन स्पर्धा व कविता गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत यशाची परंपरा कायम राखली. लांब उडी मोठा गट व शंभर मीटर धावणे या वैयक्तिक स्पर्धेत सुनिता वाघमारे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक संपादन केला. सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक तानाजी भोसले, ज्येष्ठ शिक्षिका सुनीता मोरे व सुनयना देवर्षी यांनी मार्गदर्शन केले.
शाळेच्या यशाबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मयूर खरमारे, सरपंच राधाताई मुंढारकर, उपसरपंच अरुण तळावडे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत ससाणे, केंद्रप्रमुख सुनील साबळे यांनी अभिनंदन केले. स्पर्धेतील विजयी विद्यार्थी तालुकास्तरीय स्पर्धेत पात्र ठरले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवडला ‘वॉटर प्लस सिटी’ बनविण्यासाठी निधीची मागणी ; खासदार बारणेंनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
– तळेगाव नगरपरिषदेकडून शंभर टक्के कर वसुलीचे ध्येय ! नागरिकांनी थकीत कर तत्काळ भरण्याचे आव्हान । Talegaon News
– महाराष्ट्राला वीस लाख घरे मंजूर ! प्रत्येक गरीब, शेतकऱ्याला प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पक्के घर मिळणार