Dainik Maval News : रोटरी सिटी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या वतीने प्रगती विद्यामंदिर येथील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची मोफत नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप हा उपक्रम घेण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांच्या हितासाठी तळेगाव दाभाडे रोटरी सिटी सदैव कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी यावेळी केले.
शाळेतील एकूण ११५० विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करून ज्या विद्यार्थ्यांना चष्मे आवश्यक आहेत त्यांना चष्मे मोफत देण्यात आले. तसेच शालिनीताई कडलक यांच्यामार्फत ६५० विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शालेय समितीचे अध्यक्ष दामोदर शिंदे, इंदोरीचे सरपंच शशिकांत शिंदे, उपसरपंच संदीप ढोरे, रोटरी सिटीचे संस्थापक विलास काळोखे, सहप्रांतपाल दीपक फल्ले, सुरेश शेंडे, सुरेश दाभाडे, संतोष परदेशी, बसप्पा भंडारी, विनोद राठोड, मनोज नायडू हे उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या