Dainik Maval News : मावळ तालुका हा खरीपातील इंद्रायणी भात पिकासाठी प्रसिद्ध आहे. असे असले तरीही तालुक्यात रब्बी पिकाचे क्षेत्रही मोठे आहे. तालुक्यातील पुर्व पट्ट्यातील शेतकरी सर्वाधिक रब्बी पिकांची लागवड करतात. यासह उर्वरित भागातही कोणते ना कोणते पीक घेतले जाते.
नोव्हेंबर – डिसेंबर महिन्यात तालुक्यात रब्बी पिकांच्या लागवडी पूर्ण झाल्या होत्या. ही सर्वच पिके आता चांगली बहरली आहेत. मावळात गहू, हरभरा, वाटाणा, मसूर आदी रब्बी हंगामातील पिके घेतली जातात. त्यातही यंदा रब्बी हरभरा पिकाचे क्षेत्रात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे.
मावळ तालुक्यात खरीप भात पिकाचे क्षेत्र हे जवळपास साडेबारा ते तेरा हजार हेक्टर आहे. दुसरीकडे पाण्याच्या उपलब्धतेनुसार रब्बी पिकाचे क्षेत्र जवळपास पाच हजार हेक्टर इतके आहे. भाताचे पीक काढल्यानंतर ओल असलेल्या भात खाचरात शेतकरी रब्बीचे पिक पेरतात. यात प्रामुख्याने हरभरा, मसूर, वाटाणा व गहू हे पिके घेतली जातत.
यंदा परतीचा पाऊस लांबल्याने भात कापणी लांबली. होती परिणामी रब्बी पिकाची पेरणी देखील उशीराने झाले. परंतू आता पोषक वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकेही चांगली जोमात आली आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या