पिपोळी येथे एका साडेतीन वर्षीय मुलाच्या अंगावर गरम कालवण सांडल्याने तो गंभीररित्या भाजल्याची दुर्घटना घडली आहे. नाथा पिंपळे यांचा साडेतीन वर्षांचा शिव हा मुलगा घरात असताना त्याच्या अंगावर कालवण सांडले. कालवण अंगावर सांडल्याने शिव वेदनेने जोरजोरात ओरडू लागला.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
घरातील सदस्यांनी त्याला तत्काळ जवळील रुग्णालयात नेले. मात्र, शिव गंभीर जखमी झाल्याने, अधिक भाजल्याने त्याला थेट वाकड येथील सुर्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ( Boiling Curry Spilled On Child Seriously Injured )
अधिक वाचा –
– मुळशी तालुक्यातील प्लस व्हॅली येथील खोल कुंडात बुडून 23 वर्षीय पर्यटकाचा मृत्यू
– लव्ह मॅरेजनंतरही दुसरीवर जीव जडला, दुसऱ्यांदा लव्ह मॅरेज करण्यासाठी पत्नीसोबत केले भयानक कृत्य