Dainik Maval News : मुंबई आणि पुणे ही दोन शहरे आणखीन जवळ यावीत या हेतूने देशातील पहिला द्रुतगती मार्ग बांधण्याचे निश्चित झाले. सन 2002 मध्ये मुंबई-पुणे हा सहा पदरी मार्ग पूर्ण झाला व जनतेसाठी खुला करण्यात आला. त्यास यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्ग असे नाव देण्यात आले.
विनाव्यत्य प्रवास यामुळे मुंबई आणि पुणे या दोन शहरांतील एकूण 4 ते 5 तासांचे अंतर यामुळे अवघ्या दोन अडीच तासांवर आले. दिवसभरात लाखो वाहनांची वाहतूक सुरु झाली. परंतु सुसाट वेगामुळे येथे अपघातही वाढू लागले. यातही बोरघाट हद्दीत होणारे अपघात ही चिंतेची बाब होती.
- अपघातांचे प्रमाण चिंताजनक असताना वाहनाचा वेग, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, लेनची शिस्त मोडणे, वाहनाचा टायर फुटणे ही काही प्रमुख कारणे समोर आली. त्यामुळे द्रुतगती मार्गावरील अपघात रोखण्यासाठी विविध प्रयोग वाहतूक विभागाकडून करण्यात आले.
त्यातही बोरघाट हद्दीत आता लावण्यात आलेल्या लाइट्स व रबलिंग मुळे अपघातांना आळा बसला असून 2023 पेक्षा 2024 सालात झालेल्या अपघातात यामुळे कमालीची घट झाली आहे. विशेषतः 90 अपघातांमध्ये 40 जण मृत्युमुखी पडले असून ही संख्या 2023 पेक्षा कमी आहे.
बोरघाट हद्दीत अपघाताला आळा बसावा म्हणून अनेक उपाय करण्यात आले आहेत. त्यातही रात्रीच्या वेळी अपघातांवर नियंत्रण मिळावे म्हणून बोरघाटात किलोमीटर 36 ते 45 दरम्यान जवळपास 602 विद्युत पोल बसवून याठिकाणी रोषणाई करण्यात आली असून यामुळे अपघाताला आळा बसला आहे.
वाहतूक विभाग व सामाजिक संस्थांच्या योगदानामुळे बोरघाट हद्दीत अपघाताला बऱ्यापैकी आळा बसला आहे. महत्वाचं म्हणजे जिवितहानीमध्ये घट झाली आहे. द्रुतगती महामार्गावरील विविध उपाययोजनांसोबत घाटात विद्युत रोषणाई केल्याने अंधारामुळे होणारे अपघात नियंत्रित झाले आहेत. यासह अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळत असल्याने जिवितहानी रोखण्यास यश मिळत आहे. – गुरुनाथ साठेलकर, प्रमुख, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संघटना
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या