Dainik Maval News : मुलांमध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि पोषक आहार घेण्याबाबत चांगल्या सवयी लागाव्यात यासाठी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविलेल्या मावळ तालुक्यातील 35 शाळांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मावळ पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात या शाळांना इट राईट सर्टिफिकेट व रोपे देऊन सत्कार करण्यात आला.
बालरक्षा भारत या संस्थेतर्फे 2022-23 मध्ये मावळ तालुक्यातील जांभूळ, कान्हे, साते, ब्राम्हणवाडी, वडगाव, केशवनगर, उर्से, बेबडओहळ, गोडुंब्रे, सांगवडे, परंदवडी, गहुंजे, दारुंब्रे, भीमाशंकर कॉलनी, बधलवाडी, इंदोरी, नानोली तर्फे चाकण, कोयतेवस्ती, आंबी, नवलाख उंब्रे, खडकाळा क्रं.१,२,३, आंबळे, टाकवे बुद्रूक, भोयरे, निगडे, वराळे, माळवाडी या जिल्हा परिषदेच्या 29 तसेच तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या सहा अशा एकूण 35 शाळांमध्ये इट राईट स्कूल हा प्रकल्प राबविण्यात आला होता.
शाळेतील मुलांमध्ये स्वच्छ, सुरक्षित आणि पोषक आहार घेण्याबाबत चांगल्या सवयी लागाव्यात. बाहेरचे पदार्थ (जंक फूड) खाण्याचे टाळून घरगुती आहाराचे महत्त्व त्यांच्या लक्षात यावे यासाठी वर्षभर विविध उपक्रम घेण्यात आले होते.
गटविकास अधिकारी कुलदीप प्रधान व गट शिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांच्या मार्गदर्शनाखाली व शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्याने सर्व 35 शाळांमध्ये अपेक्षित आणि भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) मार्फत आखून दिलेली सर्व कामे पूर्ण करण्यात आली असून या सर्व शाळांना प्रमाणपत्र देखील मिळाले आहे.
सहाय्यक गटविकास अधिकारी सेवक थोरात, विस्तार अधिकारी नानाभाऊ शेळकंदे, विस्तार अधिकारी निर्मला काळे, विषय साधन व्यक्ती सविता पाटील, बालरक्षा संस्थेतील राज्यव्यवस्थापक जितेंद्र सावकार, प्रोग्राम फील्ड फॅसिलेटर आज्ञा नाटक, ज्योती गायकवाड आदींसह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व नगरपालिका शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
सेवक थोरात व नानाभाऊ शेळकंदे यांनी मार्गदर्शन केळे. अपर्णा जोशी यांनी बालरक्षा भारत प्रकल्पाची सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक संदीप सकपाळ यांनी मनोगत व्यक्त केले. सविता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती गायकवाड यांनी आभार मानले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळवासियांना दिलासा द्यावा… वडगाव मावळ येथे कायमस्वरूपी उपविभागीय कार्यालय सुरू करण्याची मागणी
– आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत केल्या जाणार, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, वाचा सविस्तर
– पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची बदली, जितेंद्र डूडी नवे जिल्हाधिकारी म्हणून रुजू ; कोण आहेत जितेंद्र डूडी? जाणून घ्या