Dainik Maval News : मावळच्या जनतेने भरभरून दिले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील वाड्या वस्तीवरील विकासकामांसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले. पवनानगर परिसरातील विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन खासदार बारणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू खांडभोर, संघटक अमित कुंभार, अंकुश देशमुख, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, दत्ता केदारी, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, धरणग्रस्त परिषदेचे अध्यक्ष रविकांत रसाळ, पवना शिक्षण संकुलाचे प्राचार्य भाऊसाहेब आगळमे, जवणचे माजी उपसरपंच संतोष भिकोले, शाखाप्रमुख किशोर शिर्के, काले ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आशा कालेकर, फुलाबाई कालेकर, छायाताई कालेकर, ग्रामसेवक रवींद्र वाडेकर, पवना फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर आदी उपस्थित होते.
खासदार निधीतून काले पवनानगर येथील विविध विकासकामांचे उद्घाटन यावेळी करण्यात आले. यामध्ये पवना विद्या मंदीर सिमेंट रस्ता कॉंक्रीटीकरण १२ लक्ष रुपये, स्मशान भूमी रस्ता सिमेंट कॉंक्रीटीकरण १० लक्ष रुपये, सोलर (सौर) दिवे १० लक्ष रुपये अशा विविध समाजपयोगी विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
काले-पवनानगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अमित कुंभार म्हणाले की, काले-पवनानगर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत मागील दहा वर्षात खासदार फंडातून जास्तीत जास्त निधी मिळाला असून त्यामुळे अनेक कामे मार्गी लागली आहेत. यापुढील काळात देखील खासदार महोदयांच्या माध्यमातुन इतर विकासकामे मार्गी लावण्यासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न करु.
दरम्यान, पवना विद्या मंदिर पवनानगर शाळेत हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलताना संतोष खांडगे म्हणाले की, मावळच्या विकासामध्ये खासदार बारणे यांचे योगदान मोठे आहे. विकासात राजकारण न आणता ग्रामीण भागासाठी त्यांच्याकडून जास्तीत निधी दिला जातो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाऊसाहेब आगळमे, सुत्रसंचलन सुमन जाधव, महादेव ढाकणे यांनी केले. तर आभार रोशनी मराडे यांनी मानले.