Dainik Maval News : पवन मावळ विभागातील अजिवली गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विहिरीत पाय घसरून पडल्याने एका गरीब शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लक्ष्मण बाबु केंडे (वय 48, रा. अजिवली, ता. मावळ, जि. पुणे) असे विहिरीत बुडून मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मयत लक्ष्मण केंडे यांचे बंधु नारायण तुकाराम केंडे यांनी पोलिसांना याबाबत खबर दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 22 जानेवारी) दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास अजिवली गावातील विहिरीत ही दुर्घटना घडली. लक्ष्मण केंडे हे विहिरीत पडल्याचे समजताच ग्रामस्थांनी अथक प्रयत्नांनी त्यांना पाण्याबाहेर काढून पवनानगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले ,परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
याबाबत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस निरिक्षक किशोर धुमाळ यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सिताराम बोकड हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान या दुर्दैवी घटनेबद्दल सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण? पाहा संपूर्ण यादी – महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री
– ‘एमएसआयडीसी’कडून तळेगाव-चाकण-शिक्रापूर महामार्गाच्या कामाचा मसुदा सादर, आता निर्णय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात
– मावळच्या विकासासाठी कटिबद्ध, जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देणार – खासदार श्रीरंग बारणे