Dainik Maval News : मराठा समाजातील अविवाहित तरुण-तरुणींसाठी जोडी जमवा वधू-वर सूचक केंद्राच्या वतीने वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दिनांक 2 फेब्रुवारी) रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत हा मेळावा तळेगाव दाभाडे येथील वैशाली मंगल कार्यालयात होणार आहे.
सदर मेळाव्याचे उद्घाटन मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते होईल, अशी माहिती जोडी जमवा वधू – वर सूचक मंडळाचे अध्यक्ष तुषार क्षीरसागर यांनी दिली.
- मंडळातर्फे वधू-वर परिचय मेळावा दरवर्षी आयोजित केला जातो. मराठा समाजातील विवाहेच्छुक युवक-युवती, तसेच त्यांच्या पालकांना अनुरूप स्थळ शोधून विवाह जुळवण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने मिळते.
या मेळाव्यामध्ये युवक – युवतींना आयुष्याचा जोडीदार कसा असावा, त्याच्या अपेक्षा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यामुळे मराठा समाजातील इच्छुक वधू – वरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मावळच्या राजकारणात भूकंप ! विधानसभा निवडणुकीत सुनिल शेळकेंविरोधात प्रचार केल्यामुळे राष्ट्रवादीच्या आठ दिग्गज नेत्यांचे पक्षातून निलंबन
– पुणे, शिवाजीनगर, चिंचवड, देहूरोड, तळेगाव, कामशेत व लोणावळा स्थानकांवर थांबणाऱ्या जलद लोकल ट्रेन सुरू करण्याची मागणी
– वडगावची भूमी केवळ मराठा साम्राज्याचे नव्हे तर भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे प्रतीक ; केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन