Dainik Maval News : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेली समरभूमी म्हणजे उंबरखिंड. दरवर्षी दिनांक 2 फेब्रुवारी रोजी उंबरखिंड येथे विजय दिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाही रविवारी (दि.2) 364 व्या विजय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
खालापूर तालुक्यातील छावणी (चावणी) येथे समरभूमी उंबरखिंड असून दरवर्षी ग्रामपंचायत चावणी, शिवदुर्ग मित्र मंडळ लोणावळा आणि पंचायत समिती खालापूर यांच्या वतीने विजय दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते.
यंदा सकाळी साडेनऊ वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी रायगड भूषण शिवशाहीर वैभव घरत यांचा पोवाडा व स्फूर्ती गीतांचा कार्यक्रम, शिवव्याख्याते शिरीष महाराज मोरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. अधिकाधिक शिवभक्तांनी कार्यक्रमाला यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
उंबरखिंड येथील ऐतिहासिक विजय –
छत्रपती शिवरायांनी लढलेल्या अनेक लढायांपैकी महत्वाची लढाई म्हणजे उंबरखिंडीची लढाई. इ.स. 1661 मध्ये शाहीस्तेखानाने कारतलबखान सरदाराला उत्तर कोकण काबीज करण्यासाठी पाठविले होते. यावेळी खान उंबरखिंड मार्गाने कोकणात उतरण्याच्या प्रयत्नात होता. तेव्हा येथील भौगोलिक परिस्थितीची खडान् खडा माहिती असलेले शिवराय व त्यांचे मावळ्यांनी खानाचा व त्याच्या फौजेचा उंबरखिंडीत फज्जा उडविला होता. केवळ 2000 मावळ्यांनी 20,000 च्या आसपास मुघल सैन्याला नामोहरम केले होते. तो दिवस 2 फेब्रुवारी होता.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City