Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी व इयत्ता पाचवीसाठी मावळ तालुक्यातून सुमारे ४ हजार ८६२ विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत.
मावळमधून शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थी प्रविष्ठ होण्याचा हा उच्चांक असल्याचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांनी सांगितले. राज्य शासनाची ही शिष्यवृत्ती परीक्षा रविवार, दिनांक ९ फेब्रुवारी २०२५ रोजी तालुक्यातील विविध केंद्रांवर संपन्न होणार आहे.
इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तालुक्यातून ३ हजार १९९ विद्यार्थी प्रविष्ट होत असून १६३ प्राथमिक शाळांमधील विद्यार्थी यात सहभागी आहेत. ही परीक्षा मावळ तालुक्यातील विविध भागातील १९ केंद्रावर होणार आहे. तर, इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तालुक्यातून १ हजार ६६३ विद्यार्थी बसणार आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City