Dainik Maval News : आपल्या सर्वांच्याच मागच्या पिढीने जगद्गुरु तुकाराम महाराजांची कर्जे बुडविली असून आता आपण सर्वांनी याची परतफेड म्हणून श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील या मंदिराच्या कळसाचे काम पूर्ण होण्यापूर्वी लाखो रुपयांची देणगी या मंदिर निर्माणाच्या कार्याला देऊन उतराई होण्याची नामी संधी आता आली आहे असे प्रतिपादन विदर्भरत्न, रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर यांनी केले.
भंडारा डोंगरावर माघ शुद्ध दशमीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या अखंड हरीनाम सप्ताह, गाथा पारायण व कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगाच्या निमित्ताने रामायणाचार्य हभप संजय महाराज पाचपोर बोलत होते.
या उद्घाटन प्रसंगी खेड तालुक्याचे आमदार बाबासाहेब काळे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर, माजी जि. प. सदस्य प्रशांत ढोरे, किसनराव कराळे पाटील, रामभाऊ कराळे पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, उपाध्यक्ष विजय सदाशिव बोत्रे, उद्योजक गजानन शेलार, ह.भ.प. रविंद्र महाराज ढोरे, मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य उपस्थित होते.
- दरम्यान पहाटे काकडा आरती संपन्न झाल्यानंतर पहाटे ५.३० वाजता माजी आमदार स्वर्गीय दिगंबरदादा भेगडे यांच्या परिवाराच्या वतीने श्री विठ्ठल-रुक्मिणी व जगद्गुरु तुकोबारायांना अभिषेक करून महापूजा करण्यात आली. यानंतर सकाळी ७ वाजता जालना जिल्ह्यातील वाकुळणी येथील संतपीठाचे प्रमुख हभप नाना महाराज तावरे यांच्या व्यासपीठ नेतृत्वाखाली गाथा पारायणाचा शुभारंभ झाला. या गाथा पारायणासाठी हजारो भाविक वाचक म्हणून सहभागी झाले आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– दुचाकी, चारचाकी वाहनांचे पक्के ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे? आरटीओकडून फेब्रुवारीचे वेळापत्रक जाहीर, पाहा आवश्यक कागदपत्रे
– पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; 1 हजार 299 कोटींच्या प्रारूप आराखड्यास व 753 कोटींच्या अतिरिक्त मागणीस मान्यता
– तळेगाव शहर हादरले ! भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी युवकाची हत्या । Murder in Talegaon Dabhade City