Dainik Maval News : देहूरोड मधील राजीव गांधी नगर येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर देहूरोड पोलिसांनी गुरुवारी (दि.6) दुपारी अडीच वाजताच्या सुमारास कारवाई केली. प्रवीण सुभाष कन्हेरे (वय 36, रा. देहूरोड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पोलीस अंमलदार सुरेश ढवळे यांनी गुरुवारी (दि. ६) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण हा कागदी चिठ्ठ्यांवर बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगारासाठी लोकांकडून आकडे लिहून घेत होता. माहिती मिळाल्यानंतर देहूरोड पोलिसांनी कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. देहूरोड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– परीक्षा केंद्रांवर ड्रोनद्वारे निगराणी, 500 मीटर परिसरात झेरॉक्स सेंटर बंद ; दहावी-बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी सुक्ष्म नियोजन
– मंत्रिमंडळाचा निर्णय : वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेस वर्षभराची मुदतवाढ
– श्रीक्षेत्र भंडारा डोंगरावरील संत तुकाराम महाराजांचे भव्य-दिव्य मंदिर वर्षभरात पूर्ण होणार – पाहा कसे असणार हे मंदिर