Dainik Maval News : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज (दि.9) आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटूंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे संवेदनशील व्यक्ती म्हणून पाहिले जाते. राज्याचे मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे हे नेहमी गोरगरिबांच्या मदतीला धावून येत होते. आताही उपमुख्यमंत्री म्हणून डेडीकेटेड टू कॉमन मॅन प्रमाणे काम करीत आहेत. अडचणीत किंवा संकटात सापडलेल्यांच्या मदतीसाठी शिंदे हे तत्परतेने धावून जातात, याचा प्रत्यय आता पुन्हा आला आहे.
- जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हभप शिरीष महाराज मोरे यांच्या आत्महत्येनंतर फक्त वारकरी संप्रदाय नाही संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. आर्थिक अडचणीतून शिरीष मोरे यांनी आपले आयुष्य संपवले. ही बाब एकनाथ शिंदे यांना समजताच त्यांनी मोरे कुटुंबियांना 32 लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.
आज (दिनांक 9 फेब्रुवारी) एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांनी हा निर्णय घेतला असून शिंदेच्या बाबतीत बोलले जाणारे अनाथांचा नाथ ही ब्रीद त्यांनी खरे करून दाखविले आहे. आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्याघरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगितले आहे. ( DCM Eknath Shinde Financial help to family of late Shirish Maharaj More )
चार चिठ्ठ्यांमध्ये सापडलं कारण
‘माझ्यावर कर्जाचं डोंगर आहे, मी कोणाकडून किती कर्ज घेतलं याची कल्पना बाबांनाही आहे. तरी मी त्यांची नावं आणि रक्कम चिठ्ठीत नमूद करत आहे. एकूण 32 लाखांचे कर्ज आहे. पैकी कार विकून 7 लाख फिटतील. वरचे 25 लाख फेडण्यासाठी तुम्ही माझ्या कुटुंबाला साथ द्या.’ अशी विनंती शिरीष महाराजांनी मित्रांना केली होती. तर, ‘मला वाटत होतं, मी हे कर्ज फेडू शकतो. परंतु आता लढण्याची ताकत माझ्यात उरली नाही. म्हणून हे टोकाचं पाऊल उचलत आहे. इतर चिठ्ठ्यांमध्ये आई, वडील, बहीण आणि होणाऱ्या पत्नीची ही महाराजांनी माफी मागितली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News