Dainik Maval News : मारुती सुझुकी बलेनो आणि ह्युंदाई i20 यांच्याशी टक्कर देण्यासाठी टाटा मोटर्सने आपली प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोझ लॉन्च केली आहे. एवढेच नाही तर काही महिन्यांपूर्वी कंपनीने त्याचे रेसर व्हर्जनही लाँच केले होते.
Altroz Car ची एक्स-शोरूम किंमत 6.64 लाख रुपयांपासून सुरू होते. मात्र तुम्ही जर फेब्रुवारी महिन्यात ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे, कारण कंपनीकडून या कारवर 1 लाख रुपयांची सूट देत आहे.
- टाटा मोटर्स विक्रीला चालना देण्यासाठी आणि स्टॉक क्लिअर करण्यासाठी Altroz वर 1 लाख रुपयांपर्यंत सूट देत आहे (MY24). या मध्ये 85,000 रुपयांची रोख सूट आणि 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर समाविष्ट आहे. परंतु, महत्वाची बाब म्हणजे ही ऑफर जुन्या मॉडेल्सवर असून नवीन मॉडेल्सवर सध्या कोणतीही सूट नाही.
टाटाच्या अनेक कारपैकी अल्ट्रोज ही कार ग्राहकांच्या पसंतीची आहे. अल्ट्रोज कारमध्ये असणारे विविध पर्याय आणि तिची क्षमता यामुळे Altroz ची मागणी वाढली आहे. टाटा मोटर्सच्या पंचजन्य ऑटोमोबाईल शोरूममध्ये जुन्या स्टॉक कारवर भरभक्कम डिस्काउंट असून सोबत नव्या कार्सवरही आकर्षक सवलती आहेत. – स्नेहल काळे, मॅनेजर, पंचजन्य ऑटोमोबाईल, तळेगाव दाभाडे
टाटा अल्ट्रोज कार बद्दल प्रमुख चार गोष्टी :
1. इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, Tata Altroz पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. हे1.2-लीटर पेट्रोल, 1.2-लीटर टर्बो-पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनद्वारे समर्थित आहे.
2. इंजिन 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ड्युअल-क्लच ऑटो ट्रान्समिशन गियरबॉक्ससह जोडलेले आहे. याशिवाय ही कार सीएनजीमध्येही उपलब्ध आहे. ही कार 18 ते 25 Kmpl प्रति लीटर असे एकत्रित मायलेज देते.
3 .ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी, कारची रेसर आवृत्ती भारतीय बाजारपेठेत लॉन्च केली गेली आहे, जी 1.2-लीटर रेव्होट्रॉन टर्बो चार्ज इंजिनसह सुसज्ज आहे आणि 120PS पॉवर आणि 170Nm टॉर्क निर्माण करते.
5. टाटा अल्ट्रोझ हॅचबॅक 7 रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यात आर्केड ग्रे, हाय स्ट्रीट गोल्ड, ऑपेरा ब्लू, डाउनटाउन रेड, अव्हेन्यू व्हाइट, हार्बर ब्लू आणि कॉस्मो डार्क यांचा समावेश आहे.
टीप : ही माहिती वितरकांकडून संकलित केलेली आहे. कुठलाही आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रे तपासून निर्णय घ्यावा. टीम दैनिक मावळ कुठल्याही आर्थिक व्यवहाराशी उत्तरदायी नाही.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News