Dainik Maval News : शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी (ता. जुन्नर) येथे शिवजयंती उत्सवाच्या (दि.19 फेब्रुवारी) कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजल्यापासून ते 20 फेब्रुवारी 2025 रोजी मध्यरात्रीपर्यंत (00.00 वा.) जुन्नर शहर व परिसरात काही मार्गावर एकेरी वाहतुकीचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.
या आदेशानुसार नारायणगाव येथून जुन्नरकडे येणारी वाहतूक ही घोडेगाव फाटा-खानापूर महाविद्यालय मार्गे धामनखेल मार्गाने शिवनेरी किल्ल्याकडे ताथेड वाहनतळ या ठिकाणी जातील. ताथेड वाहनतळ ठिकाणी लावण्यात आलेली वाहने पुन्हा माघारी जाताना वडज-सावरगाव-वारुळवाडी-नारायणगाव- घोडेगाव मार्गे जाईल.
गणेशखिंड- बनकफाटा- ओतूर या मार्गे शिवनेरीकडे येणारी वाहने ही मुंढे माध्यमिक शाळा व आसपासच्या परिसरात असलेल्या वाहनतळाच्या ठिकाणी लावतील व पुन्हा त्या मार्गे कल्याण- अहिल्यानगर, नाशिक मार्गे जातील. आपटाळे – सोमतवाडी ता. जुन्नर कडून येणारी वाहने ही प्रदक्षिणा मार्गाने हॉटेल शिवबा समोरुन ताथेड वाहनतळ येथे जातील व पुन्हा वडज मार्गे जातील, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने तुकडा बंदी कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक ; प्रस्ताव सादर करण्याचे महसूल मंत्र्यांचे निर्देश
– शेतात जाणारे रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार, महसूल मंत्र्यांचा निर्णय
– पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू । Pune News