Dainik Maval News : देहूरोड मधील आंबेडकर नगर येथे गुरुवारी (दि.13 फेब्रुवारी) रात्री झालेल्या गोळीबार खून प्रकरणातील दोन आरोपींना देहूरोड पोलिसांनी सोलापूर येथून अटक केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांना सात दिवसांची (दिनांक 24 फेब्रुवारी पर्यंत) पोलीस कोठडी ठोठावली आहे. याप्रकरणी आतापर्यंत एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली असून अद्याप एक जण फरार आहे.
शाबीर समीर शेख (वय 24), जॉन उर्फ साईतेजा शिवा चितामल्ला (वय 24,रा. विशाल मित्र मंडळाजवळ, देहूरोड, पुणे) असे अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहे.
- देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड मधील आंबेडकर नगर येथे गुरुवारी (दि.13) रात्री वाढदिवसाच्या कार्यक्रम सुरू असताना आरोपीत महिलेने चिथावणी दिल्याने तिघांनी मारहाण करीत चार गोळ्या झाडल्या. यामध्ये विक्रम रेड्डी याला गोळी लागल्याने त्याचा मृत्यू झाला, तर नंदकिशोर यादव गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सहआयुक्त डॉ शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्या आदेशान्वये पोलीस उपायुक्त परिमंडळ २ चे विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक सोहन धोत्रे, अजयकुमार राठोड, पोलीस हवालदार किरण खेडकर, प्रवीण माने, बाळासाहेब विधाते, पोलीस नाईक सुरेश ढवळे, पोलीस शिपाई प्रशांत माळी, केतन कानगुडे, संतोष महाडिक, युवराज माने, शुभम बावनकर, अमोल माने, पंकज भदाणे यांनी फरार मारेकऱ्यांपैकी शाबीर आणि साईतेजा याला सापळा रचून सोलापूर येथून रविवारी अटक केली.
आरोपीत महिलेला घटनेनंतर ताबडतोब अटक करण्यात आली होती. तिला न्यायालयाने सात दिवसांची (गुरूवार, दिनांक 20 फेब्रुवारी पर्यंत) पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर येथून अटक केलेल्या दोघांना वडगाव न्यायालयात हजर केले, असता न्यायालयाने दोघांनाही सोमवार पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime