Dainik Maval News : चिखली येथील कुदळवाडी परिसरात आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामे व पत्राशेडवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने शनिवार (दि.8 फेब्रुवारी) पासून धडक कारवाई सुरू केली. ती कारवाई शुक्रवार (दि. 14 फेब्रुवारी) पर्यंत सलग सात दिवस सुरू होती.
या करवाईत तब्बल ८२५ एकर जागा रिकामी करण्यात आली असून, जवळपास ४ हजार १११ भंगार गोदामे, लघुउद्योग व इतर आस्थापना भूईसपाट करण्यात आल्या आहेत. आता ही कारवाई स्थगित करण्यात आली आहे.
- पहाटे पाच वाजल्यापासून महापालिका व पोलिस विभागांची यंत्रणा एकत्रित येऊन ही कारवाई मोहीम सक्तीने राबवित होती. जेसीबी, पोकलेन, क्रेन, कटरच्या सहाय्याने अनधिकृत पत्राशेड, कारखाने, गोदाम, दुकाने आणि पत्राशेड तोडण्यात आले.
व्यावसायिक, लघुउद्योजक, राजकीय नेते, लोकप्रतिनिधी, मंत्री, पदाधिकारी व माजी नगरसेवकांचा दबाव झुगारून ही कारवाई सलग सात दिवस करण्यात आली. त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथकच तयार केले होते. आवश्यक यंत्रसामग्रीसह मोठा पोलिस बंदोबस्तात पार पडली.
कारवाईत तब्बल ४ हजार १११ आस्थापना पाडण्यात आल्या. त्यात एकूण ८२५ एकरचा परिसर अतिक्रमणमुक्त करण्यात आला आहे. रस्त्यासाठी आरक्षित असलेल्या जागेत डांबरीकरण करण्यात येत असून, इतर सेवा व सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत.
कुदळवाडीतील कारवाईमुळे महापालिकेला ६० कोटींचा फटका
चिखली, कुदळवाडीतील अनधिकृत भंगार गोदामांसह लघुउद्योगांवर कारवाई केल्यानंतर आता महापालिकेचे ६० काेटी रूपयांचे नुकसान झाल्याचे समाेर आले आहे. या भागात अनधिकृत व्यवसाय असले तरी काही व्यावसायिक मालमत्ता कर दरवर्षी भरत हाेते. त्यामुळे या व्यावसायिकांकडून महापालिका तिजोरीत चालू आर्थिक वर्षात जमा होऊ शकणारा ६० कोटी रुपयांचा मालमत्ता कर बुडणार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– सरकारची लाडक्या बहिणींवरील माया आटली ! ‘या’ महिलांची नावे वगळणार, दरवर्षी करावी लागणार ई-केवायसी । Ladki Bahin Yojana
– वडगावकरांचा लाडका शिवम, दीक्षा समारंभानंतर बनले ‘महक ऋषी’ ; दीक्षा समारंभासाठी भक्तीचा महापूर । Maval News
– खळबळजनक ! गावच्या यात्रेत झालेल्या वादातून चार जणांचा एकावर प्राणघातक हल्ला, मावळ तालुक्यातील घटना । Maval Crime