Dainik Maval News : लोकराज्य महाभियान संस्था व विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मधून आणलेल्या तीर्थ कुंभ कलशाचा पूजन सोहळा टाकवे गावात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
जगभरामध्ये महाकुंभाची जोरदार चर्चा आहे. हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून महाकुंभकडे पाहिले जाते. यावर्षीचा कुंभ १४४ वर्षांनी आला असून प्रयागराज याठिकाणी आजवर 60 कोटीहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे. परंतु अनेकांना इच्छा असूनही महाकुंभामध्ये सहभागी होता आले नाही.
- यापार्श्वभूमीवर महाकुंभातील तेरा आखाड्याच्या महंतांनी सिद्ध केलेले तीर्थ कलश देशभरातील भाविकांपर्यंत पोहोचविले जात आहे. मावळ तालुक्यातील टाकवे गावात ह्या जलकुंभांचे टाळ मृदंगांच्या गजरात स्वागत करून पूजन करण्यात आले. कुंभ कलशाची ग्राम प्रदक्षिणा पूर्ण करून महिलाभगिनींच्याहस्ते, वारकऱ्यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. विधीवत तीर्थ कलश पूजन करण्यात आले व त्यासंदर्भात माहिती देण्यात आली.
यावेळी बोलताना, महा कुंभ हे जगातील हिंदू धर्मियांचा आस्थेचे महत्त्वाचे ठिकाण असून समरसतेचं जगातील एकमेव उदाहरण आहे, असे विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री महेंद्र असवले यांनी सांगितलं. तसेच, या कुंभामध्ये स्वतः प्रयागराजला जाऊन आलेले कोंडीबा महाराज जांभुळकर यांनी महा कुंभ मेळाव्यात आलेली अनुभूती विशद करून कुंभ मेळा व्यवस्थेचं कौतुक केलं.
याप्रसंगी अनुलोमचे भाग जनसेवक बाळासाहेब खांडभोर, तानाजी टेमगिरे, योगेश गुणाट, निखिल भांगरे, ऋषिकेश पुराणे, गौरव वाघमारे, रवी असवले, मंगल टेमगिरे, अर्चना असवले, सीमा असवले, वैदेही असवले, बबन कोंडे, महादू कुटे, भरत कुटे, महादू शिरसागर, सुभाष असवले, बंडोबा असवले, खंडू शिंदे, निवृत्ती गायकवाड व ग्रामस्थ उपस्थित होते.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा