Dainik Maval News : माझी वसुंधरा अभियान आणि शहर स्वच्छता अभियान यांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये कचरामुक्त शहर (गारबेज फ्री सिटी-जीएफसी) या घटकाबाबत संदेश देण्यासाठी नाला स्वच्छता आणि सीड बॉल रुजविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मंत्रा सिटी रस्त्यालगत असलेल्या नाल्याची सफाई केली. या नाल्याची पूर्णपणे स्वच्छ करून पावसाळी पाणी वाहण्यासाठी प्रवाह सुरळीत करण्यात येणार आहे. यामुळे नाल्यातून वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
मुख्याधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली कचरामुक्त शहर घटकाच्या प्रमुख स्थापत्य अभियंता गौरी चव्हाण आणि आरोग्य विभाग प्रमुख अभिषेक शिंदे यांनी उपक्रमाचे नियोजन केले.
उपमुख्याधिकारी ममता राठोड, कर व प्रशासकीय अधिकारी मोनिका झरेकर, भांडार विभाग प्रमुख महाजन, बांधकाम विभाग प्रमुख राम सरगर, आरोग्य निरीक्षक प्रमोद फुले, आरोग्य निरीक्षक तुकाराम मोरमारे, उद्यान समन्वयक रणजीत सूर्यवंशी, लिपिक प्रवीण शिंदे, प्रवीण माने, रेवती खांदवे, सुजाता घोडेकर, आदेश गरुड, रोहित आगळे, गौरव तापकीर, आदींनी उपक्रमात सहभाग घेतला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा