Dainik Maval News : वडगाव मावळ येथील श्री पोटोबा, महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थानच्या विश्वस्तपदी मावळ विचार मंचचे संस्थापक भास्करराव म्हाळसकर यांची नियुक्ती धर्मदाय आयुक्त यांनी नुकतीच केली आहे.
ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज, महादेव, मारुती, दत्त देवस्थान संस्थानचे माजी मुख्य विश्वस्त, स्व. सोपानराव म्हाळसकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विश्वस्त पदावर स्थानिक विश्वस्त मंडळाकडून भास्करराव म्हाळसकर यांची नियुक्ती व्हावी, अशी शिफारस धर्मदाय आयुक्त्यांकडे करण्यात आली होती.
पुणे येथील धर्मादाय उपआयुक्त डॉ राजेश परदेशी यांनी विश्वस्त मंडळी दिलेल्या शिफारशीवर छाननी करून भास्करराव म्हाळसकर यांच्या नावास मंजुरी दिली आहे.
भास्करराव म्हाळसकर हे मावळ भाजपाचे माजी अध्यक्ष असून वडगाव शहरातील विविध सामाजिक संस्थांवर पदाधिकारी व सल्लागार म्हणून काम पाहतात. भास्करराव म्हाळसकर यांच्या नियुक्तीने सर्वांकडून स्वागत व अभिनंदन होत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा