Dainik Maval News : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे 3 लाख 27 हजार रुपये किमतीचे लागवड केलेल्या अफूची फुले बोंडे आलेली हिरवीगार 218 झाडे देहूगाव काळखे वस्ती येथून गुरुवारी पहाटे ताब्यात घेतली, सोबत अफूची शेती करणाऱ्या एका शेतकऱ्याला अटक केली आहे.
दिलीप चंद्रकांत काळोखे (वय 57, रा. काळोखे वस्ती, देहूगाव,पुणे .) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये गस्तीवर असताना पोलीस अंमलदार किशोर परदेशी व जावेद बागसिराज यांना बातमीदाराकडून काळोखे वस्ती येथे अफूची लागवड केल्याची माहिती मिळाली.
त्याअनुषंगाने विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कदम,पोलीस अंमलदार मयूर वाडकर,शिल्पा कांबळे,जावेद बागसिराज,किशोर परदेशी यांनी काळोखे वस्ती येथे दिलीप काळोखे यांच्या शेतावरती तपासणी केली असता पप्पू या अमली पदार्थाची फुले-बोंड्या आलेली हिरवीगार अशी सुमारे २१८ लागवड केलेली झाडे आढळून आले.
पथकाने सर्व झाडे ताब्यात घेत शेतकरी काळोखे याला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध देहूरोड पोलीस ठाण्यामध्ये एन.डी.पी.एस अ कायदा कलम ८ ( ब),१८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास देहूरोड पोलीस करीत आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत मावळ तालुक्यातील 1,602 लाभार्थींना मंजुरीपत्र वाटप । Maval News
– मोठी बातमी : लोणावळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाची धडक कारवाई । Lonavala
– दहावीच्या विद्यार्थ्यांना आमदार शेळकेंकडून खास पद्धतीने ‘ऑल दी बेस्ट’ ; संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा