Dainik Maval News : आपल्याला आवाज दिला या गैरसमजातून एका अल्पवयीन मुलाला दोन जणांनी दगडाने मारहाण केली. ही घटना दारूंब्रे गावात बुधवारी (दि.5) सायंकाळी घडली.
आर्यन संजय आगळे (वय 17, रा. दारूंब्रे, ता. मावळ, जि. पुणे) असे मारहाणीत जखमी झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव असून त्यानी गुरुवारी (दि.5) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ओंकार संताजी सोरटे (वय 21) आणि एका अल्पवयीन मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास दारूंब्रे चौकात फिर्यादी यांचा मित्र दुचाकीवरून जात असताना त्यास आवाज दिला. मात्र फिर्यादी यांनी आपल्याला आवाज दिल्याचा गैरसमज अल्पवयीन मुलाला झाला.
तो फिर्यादी यांच्याकडे आला आणि म्हणाला की, मला आवाज का दिला. तुला लय माज आला आहे काय, अशी म्हणत फिर्यादी यांच्या कानाखाली मारली. त्यानंतर अल्पवयीन मुलाने ओंकार सोरटे याला बोलावून घेतले. त्याने तुला आज मारूनच टाकतो, असे म्हणत फिर्यादी यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने दगडाने डोक्यात मारहाण केली. तसच फिर्यादी यांचा चुलतभाऊ प्रेम आंधळे यांस हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News