Dainik Maval News : संत तुकाराम महाराज बीज निमित्ताने जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचा लोकार्पण सोहळा येत्या मंगळवारी, दिनांक 11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता जगद्गुरु संत तुकाराम महाराज मुख्य मंदिर, श्रीक्षेत्र देहू या ठिकाणी पार पडणार आहे.
या प्रसंगी विशेष उपस्थिती वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस फाऊंडेशनचे सी.ई.ओ पवनकुमार सोलंकी आणि संत तुकाराम महाराज देवस्थान ट्रस्ट – श्रीक्षेत्र देहूचे अध्यक्ष ह.भ.प. पुरुषोत्तम मोरे यांची राहणार आहे. तर संकल्पना व आयोजन दिलीप सोनिगरा ज्वेलर्स यांनी केले आहे.
- दिलीप सोनिगरा म्हणाले की जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पावन झालेल्या नगरीमध्ये आम्ही वास्तव करत असून याच परिसरात आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून व्यवसायात स्थिर झालो आहे. तुकाराम महाराजांवर आमची नितांत श्रद्धा, प्रेम आणि स्नेह आहे.
याच सदभावनेतून आम्ही जगातील सर्वात मोठी पगडी तयार केली असून वर्ल्ड रेकॉर्डस् इंडिया ॲन्ड जिनिअस बुकमध्ये हिची नोंद होणार आहे. सदरील पगडीचा घेराव हा 22 फुटांचा असून पगडीची उंची 4 फूट आहे. तर पगडीला 450 मीटर लांबीचा कपडा लागला आहे.
सदरील पगडी दर्शनासाठी 10 तारखेला सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत दिलीप सोनिगारा ज्वेलर्स चिंचवड येथे ठेवण्यात येणार आहे. सदरील पगडी पाहण्यासाठी व दर्शनासाठी सर्वांसाठी खुली आहे. तरी जास्तीजास्त पिंपरी चिंचवडकरांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन दिलीप सोनिगरा यांनी केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– जागतिक महिला दिन : अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार ; योजना बंद होणार नाही – मुख्यमंत्री
– पवना धरण जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रात अतिक्रमणे ; जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची कबुली । Maval News
– चिमुकलीपाठोपाठ आईनेही घेतला जगाचा निरोप ! 46 दिवस मृत्यूसोबत सुरू असलेली झुंज अयशस्वी । Pune News