Dainik Maval News : वडगाव मावळ येथील श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यापक महाविद्यालयचे आयक्यूएसी अंतर्गत दोन दिवसीय विशेष श्रम संस्कार शिबिर कार्ला (ता. मावळ) येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे संयोजन समाजसेवा विभाग प्रमुख डॉ. शीतल देवळालकर यांनी केले.
शिबिराचे उद्घाटन कार्ला गावच्या सरपंच दीपाली हुलावळे आणि उपसरपंच अभिषेक जाधव यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्या सोनाली गोरे व गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
- पहिल्या दिवशी गावातील ग्रामपंचायत, अंगणवाडी, तळ्याजवळील महादेव मंदिर परिसरातील साफसफाई करून फुलझाडे लावण्यात आली. दुपारच्या सत्रात हकदर्शक कंपनीचे वतीने निलेश पवार यांनी विद्यार्थ्यांना सायबर सेक्युरिटी या विषयावर मार्गदर्शन केले.
संध्याकाळचे सत्रात सर्पमित्र अतुल सव्वाखंडे व त्यांचे सहकारी पाटील यांनी ‘सर्प : समज व गैरसमज’ याबाबत विद्यार्थ्यांना उद्बोधन केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन बाबत काही वैज्ञानिक प्रयोगाद्वारे प्रात्यक्षिके करून दाखविली. संध्याकाळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
- दुसऱ्या दिवशी सकाळी योगासने व सूर्यनमस्काराची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यानंतर गावातील मारुती मंदिर, ग्रामपंचायत, महादेव मंदिर व जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यासाठी रांगोळी व मेहंदी स्पर्धा घेण्यात आली.
शिबिरातील शेवटचे पुष्प लिली इंग्लिश माध्यम शाळेचे मुख्याध्यापक चेतन देशमुख यांचे भावी शिक्षक आणि समाजभान या विषयावर मार्गदर्शन झाले. शिबिराच्या समारोपासाठी सरपंच दीपालीताई हुलावळे व उपसरपंच अभिषेक जाधव उपस्थित उपस्थिती होते. यावेळी शिबिरातील विद्यार्थी अथर्व गरुड व रेश्मा चव्हाण यांनी आपले अनुभव कथन केले.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– भंडारा डोंगरावरील मंदिराच्या उभारणीसाठी शासन सर्वतोपरी मदत करेल ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
– तुकाराम..तुकाराम.. नाम घेता कापे यम । लाखो भाविकांच्या उपस्थितीत संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा बीज सोहळा संपन्न
– पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीवर उपाय, रिंग रोड बाबत महत्वाची माहिती ; ‘या’ 13 गावात भूसंपादनाला वेग