Dainik Maval News : मावळ तालुक्यातील परंदवडी येथे शिरगाव पोलिसांनी ३ किलो ८०० ग्रॅम वजनाचा गांजा पकडला. ही कारवाई मंगळवारी (दि. १८) सायंकाळी करण्यात आली. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
सोहम राजू चंदेलिया (वय २४), राजू लालचंद चंदेलिया (वय ४५), कशिश सोहन चंदेलिया (वय २२, सर्व रा. परंदवडी, मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रसाद जांगिलवाड यांनी बुधवारी (दि. १९) शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परंदवडी येथील साई आंगण कॉलनी मध्ये तिघांकडे गांजा असल्याची माहिती शिरगाव पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींच्या घरात कारवाई करत तीन किलो ८०० ग्रॅम वजनाचा तीन लाख २२ हजार ७०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. शिरगाव पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी मोर्चेबांधणी ; 22 मार्चला सर्व उमेदवारांची बैठक
– पवना, इंद्रायणी नदी प्रदूषणावर आमदार सुनिल शेळकेंनी विधानसभेत उठवला आवाज ; मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या…
– मावळ मतदारसंघातील रेल्वेचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी येत्या आठ दिवसांत बैठक ; केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची ग्वाही । Maval Lok Sabha